पिंपरी - चिंचवड दर्शन हि बससेवा की जनतेची आर्थिक लूट - विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल
पिंपरी ( सह्याद्री बुलेटिन ) - पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती शहरातील नागरीकांना आणि पर्यटकांना व्हावी, या उद्देशाने पिंपरी - चिंचवड दर्शन बससेवा सुरु करण्यात आली आहे. परंतु या बससेवेत तिकीट दर जास्त असल्यामुळे हि बस सेवा व्यवहार्य ठरणार नाही, असे परखड मत विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी प्रसिध्दी पत्रकांद्वारे व्यक्त केले
पिंपरी चिंचवड दर्शन बससेवेचे तिकीट पाचशे (500) रुपये ठेवले आहे. पीएमपीएमएल दैंनदिन पास हा ज्येष्ठासाठी 40 रुपये तर सर्वसामांन्यासाठी 70 रुपये आहे. त्यामुळे 500 रुपये खर्च करुन नागरीक या सेवेचा लाभ घेतील का? याबाबत साशंकताच आहे. यापेक्षा खासगी कॅब सेवा स्वस्तात घेता येते.
शहरात जागोजागी कच-याच्या ढिगांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. 500 रुपये घेऊन पीएमपीएमएल हे कच-यांचे ढिग दाखविणार आहेत काय? मोठा गाजावाजा करुन पिंपरी चिंचवड दर्शन बससेवा करुन शहरवासियांच्या तोडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. असे या पत्रकात म्हटले आहे.